ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचे अधिकार सरपंचांना दिलेले आहेत.
सरपंचाचे पद रिकामे असेल अगर ते रजेवर असतील तर उपसरपंचांनी बैठक बोलवावी. जर सरपंच किंवा उपसरपंच यांनी पुरेशा कारणाशिवाय वरील सहा सभांपैकी कोणतीही एक सभा घेण्यास कसूर केल्यास सरपंच किंवा उपसरपंच व्या पदावर राहण्यास अपात्र ठरेल. अशी सभा बोलाविण्यास प्रथम दर्शनी जबाबदार ग्रामसेवक असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होवून तो निलंबित होऊ शकतो. कारण कलम २ नुसार सरपंचाने किंवा उपसरपंचाने ठराविक कालावधीत कोणतीही ग्रामसभा बोलावण्यात कसूर केल्यास सचिव सभा बोलावेल आणि अशी सभा ही सरपंचाच्या किंवा यथास्थिती, उपसरपंचाच्या सहमतीने बोलाविण्यात आली आहे असे गृहीत धरण्यात येईल.