मळणी म्हणजे काय?www.marathihelp.com

मळणी म्हणजे काय?

तृणधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या पिकांची मळणी आणि उफणणी करून दाणे गोळा करतात. मळणी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तृणधान्याची कणसे, कडधान्याच्या शेंगा, गव्हाचे पीक इ. वाळल्यानंतर खळ्यात पसरून त्यावरून बैलांची पाथ धरून पीक त्यांच्या पायाखाली तुडविले जाते.

पिकाची काढणी व मळणी : तृणधान्यांच्या, कडधान्यांच्या व वैरणीच्या पिकांची काढणी विळ्याने कापून करतात. अलीकडे काही पिकांची कापणी यांत्रिक अवजारानेही करतात. कापूस हाताने वेचून काढतात. अमेरिकेत कापसाच्या वेचणीसाठी यंत्रांचा वापर करतात. भुईमूग, बटाटा यांसारख्या पिकांची काढणी कुळव किंवा लहान नांगर वापरून करतात. जमिनीवर आलेले भुईमुगाचे वेल, बटाटे इ. हाताने वेचून गोळा करतात. रताळे, कोनफळ, सुरण, आले, हळद इ. कंदमुळे कुदळीचा वापर करून खणून काढतात. फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या इ. हाताने काढतात. निरनिराळ्या पिकांच्या काढणीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात.

काढणीनंतर तृणधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या पिकांची मळणी आणि उफणणी करून दाणे गोळा करतात. मळणी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तृणधान्याची कणसे, कडधान्याच्या शेंगा, गव्हाचे पीक इ. वाळल्यानंतर खळ्यात पसरून त्यावरून बैलांची पाथ धरून पीक त्यांच्या पायाखाली तुडविले जाते. तुडविल्यामुळे त्याचे दाणे वेगळे होतात. गव्हाची मळणी करण्यासाठी ओलपाड गहू मळणी यंत्राचा वापर काही प्रमाणात केला जातो. ज्वारीच्या, बाजरीच्या कणसावरून दगडी रूळ फिरवूनही मळणी केली जाते. भात पिकाच्या पेंढया बांधून त्या बाकडयावर किंवा लोखंडी खाटेवर झोडपून मळणी करण्याचा प्रघात आहे. भात मळणीसाठी ‘ अन्नपूर्णा ’ या जपानी पद्धतीच्या मळणी यंत्राचा वापरही केला जातो. मळून तयार झालेले धान्य व भुसा नैसर्गिक वाऱ्याच्या साहाय्याने उफणून दाणे वेगळे केले जातात. यासाठी यांत्रिक उफणणी पंख्याचा वापरही करतात. तयार झालेले स्वच्छ धान्य पोत्यांत भरून साठवून ठेवतात. 

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 4393 +22