स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला काय म्हणतात?www.marathihelp.com

या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.

प्रकाश संश्लेषण (photosynthesis): सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने ग्लुकोज (C6H12O6), सुक्रोज (C12H22O11), स्टार्च (C6H10O5) इ. गुंतागुंतीच्या संयुगांची निर्मिती होते. ही प्रक्रिया बुरशी, भूछत्रे इ. क्लोरोफिलविरहित (हरितद्रव्यहीन) वनस्पती [उदा. कवक] सोडल्यास इतर सर्व वनस्पतींत आढळते; ह्या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण’ म्हणतात. हा शोध लावण्याचे श्रेय डच वैद्य जे. इंगेनहाउस (१७७९) आणि स्विस शास्त्रज्ञ एन्. टी. द सोस्यूर (१८०४) यांना दिले जाते. तत्पूर्वी, जमिनीतील कुजलेल्या (ह्युमस) कार्बनी पदार्थापासून वनस्पतींचे पोषण होते, असे मानले जात असे.

प्रकाश संश्लेषणाची थोडक्यात रासायनिक अभिक्रिया: 6CO2 + 6(H2O) → C6H12O6 + 6O2

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 2 years ago) 5 Answer 3402 +22