उपयोजित इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

उपयोजित इतिहास म्हणजे काय?

उपयोजित इतिहास म्हणजे सध्याच्या आव्हानांवर, विशेषत: धोरणनिर्मितीच्या क्षेत्रातील आव्हानांवर भूतकाळाच्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष लागू करणे. उपयोजित इतिहासाचा सार्वजनिक इतिहासाच्या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे.


उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो .

(१) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.

(२) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.

(३) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.

(४) उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5705 +22