अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तपशील माहिती होतो. स्वरूप :एखाद्या कार्यालयात ,संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची ,समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे 'अहवाल लेखन ' होय. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू ,तारीख ,वेळ,सहभागी व्यक्ती ,प्रतिसाद ,समारोप अश्या विविध मुद्यांचा समावेश असतो.
अहवालाची प्रमुख चार अंगे :
प्रास्ताविक(अहवालाचा प्रारंभ )
अहवालाचा मध्य( विस्तार )
अहवालाचा शेवट ( समारोप )
अहवालाची भाषा
अहवाल लेखनाची वैशिष्टे :
वास्तुनिष्टत्ता आणि सुस्पष्टता :
अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण ,सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना ,हेतू ,निष्कर्ष इत्यादी अनेक महत्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात .
विश्वसनियता :
अहवालातील विश्वासनीय माहिती आणि तथ्यानच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसानीतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जाते .
सोपेपणा :
शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते.हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा ही सोपी होते.
शब्दमर्यादा :
अहवालाच्या विषयावर / स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रिडाविषयक ,इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात .
निःपक्षपातीपणा :
अहवालाचा विषय कोणताही असो ,प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट म्हणजे त्या अहवालाचा निःपक्षपातीपणा.
अहवाल लेखन कसे करायचे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.