भारताच्या राजकीय चळवळीला जेव्हा हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले, तेव्हा ते टाळण्याकरिता गांधीजींनी १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची घोषणा केली. १२ मार्च १९३० रोजी ते साबरमती आश्रमातून स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही, अशी प्रतिज्ञा करून समुद्रकिनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता ७२ सत्यागही वीरांसह गेले.