1991 मध्ये भारतात आर्थिक संकट कशामुळे आले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देशांतर्गत राजकीय अस्थिरतेबरोबर जगातील काही घडामोडी भारताच्या आर्थिक संकटाला निमंत्रण देणाऱ्या ठरल्या. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने काही देशांबरोबरचे रुपी पेमेंट करार संपुष्टात आले. परिणामतः देशात येणारा नवीन रुपी ट्रेड क्रेडिट प्रवाह आटला. सन १९८८ मध्ये जागतिक विकास दर ४.५% होता तो १९९१ मध्ये २.२५% पर्यंत खाली आला