१९८९-९० वर्षासाठी चालू खात्यावरील तूट रु. ११,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या २.३ टक्के होती ती १९९०-९१ मध्ये रुपये १७,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या ३.१ टक्क्यांपर्यंत वाढली. १ जुलै ते ३ जुलै १९९१ या तीन दिवसांत रुपयाचे दोन टप्प्यांत अनुक्रमे ७ ते ९ टक्के आणि ११ टक्के इतके अवमूल्यन करण्यात आले.