भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत (26 जुलै 2005)ला अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे मुंबई ठप्प होऊन 1493 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला 17 वर्षे झाली आहेत. आजही मुंबईत काही तास मुसळधार पाऊस पडल्यावर 26 जुलैच्या आठवणी ताजा केल्या जातात.