पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे. या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपूर्वी झाली.