देवांनी निर्माण केल्यामुळे वेद स्वयं सिद्ध व अपौरुषेय आहे असे म्हणतात. असे असले तरी अनेक ऋषींनी वेदांची रचना केली आहे. प्राचीन काळी महर्षी व्यास ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद व्यास असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात.