वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत. पारंपारिक प्रदूषणांच्‍या स्‍वरूपांमध्‍ये वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि किरणोत्‍सर्गी (रेडियोऍक्टिव्‍ह) दूषित पदार्थांचा समावेश आहे तर जहाजांपासून होणारे प्रदूषण, प्रकाशाचे तसेच ध्‍वनि प्रदूषण ही प्रदूषण ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या आहे.