हे खंड अनेक देशांनी बनलेले आहेत आणि त्यात अंटार्क्टिका, आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांचा समावेश होतो. आज या लेखात आपण जगातील 7 खंड (7 Continents of the World), त्यांचे क्षेत्रफळ, प्रत्येक खंडांची लोकसंख्या आणि खंडांबद्दलची विविध तथ्ये पाहणार आहे.

अटलांटिक पॅसिफिक, हिंदी, आर्क्टिक व अंटार्क्टिक हे परंपरागत प्रमुख महासागर मानले जातात. यांपैकी आर्क्टिक व अंटार्क्टिक काहींच्या मते स्वतंत्र महासागर नसून आर्क्टिक हा अटलांटिकचाच भाग आहे; तर अंटार्क्टिका खंडाभोवतीचा अंटार्क्टिक महासागर हा पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांच्या विस्तारलेल्या शाखांचा बनलेला आहे.