जीडीपीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. पण दरडोई उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील 194 देशांच्या यादीत 144 व्या क्रमांकावर आहे. आशियाई देशांची यादी बघायला गेलं तर यातच भारत 33 व्या स्थानावर आहे.