अंदाजपत्रक, कौटुंबिक : मिळकत व खर्च यांत ताळमेळ राहण्याकरिता कुटुंबाने बनविलेले जमा, खर्च व शिल्लक यांचे अंदाजपत्रक. याचे स्वरुप सरकारी किंवा मोठ्या उद्योगधंद्याच्या अंदाजपत्रकासारखेच, पण लहान प्रमाणात असते. एकीकडे वर्षाची अंदाजी प्राप्ती व दुसरीकडे अन्नखर्च, घरभाडे, वीज इ.