कायद्याच्या परिभाषेप्रमाणे दुसऱ्यांच्या शरीरास वा स्थावर किंवा जंगम वस्तूस प्रत्यक्ष व बलपूर्वक इजा वा अपाय करणे म्हणजे अतिक्रमण. सामान्य जनांमध्ये मात्र 'दुसऱ्याच्या स्थावरावरील अवैध आक्रमण' या अर्थीच अतिक्रमण हा शब्द रूढ आहे.