अनुसूचित बँक तथा शेड्युल्ड बँक ही रिझर्व्ह बँक कायदा , १९३४च्या अन्वये असणाऱ्या दुसऱ्या अनुसूचित समाविष्ट असणारी बँक होय, अनुसूचित बँकेला आपल्या व्यवहारांची माहिती रिझर्व्ह बँकेला दर आठवड्याला द्यावी लागते. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी रिझर्व्ह बँक अनुसूचित बँकावर कडक लक्ष ठेवून असते.