वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या मूल्यांची रुजवणूक करता येते. अभ्यासक्रमामुळे सामाजिक संस्कृतीशी विद्यार्थ्यांचा परिचय होतो. सामाजिक परिवर्तन व रूढी-परंपरा याच्ंयात समन्वय साधण्यास इतिहासविषयाच्या अभ्यासक्रमाची खूप मदत होते.