अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे