वस्तूंचे उत्पादन आणि सेवापुरवठा यांकरीता मुद्दाम निश्चित केलेले शुल्कविरहित प्रदेश म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone – SEZ) होय. हा प्रदेश कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी आणि शुल्क व कर आकारणीसाठी परदेशी मुलूख म्हणून समजण्यात येतो.