रोजगार : वैयक्तिक दृष्ट्या व्यक्तीला एखादा कामधंदा वा आर्थिक लाभाचा व्यवसाय मिळणे म्हणजे रोजगार होय. राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्षम व इच्छुक लोकांना त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था किती प्रमाणात काम करण्याची संधी उपलब्ध करून देते याचे निदर्शक असणारी अवस्था, म्हणजे पूर्ण वा एकूण रोजगार होय.