अंतराळ स्थानकावरील चमूचा सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरू होतो. त्यानंतर झोपेनंतरची नित्यक्रमे आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरू होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते.