लष्करी अगर राजकीय सहकार्य, आर्थिक मदत व वैचारिक प्रचार इ. सर्व मार्गांनी, आपल्या गटात दुसऱ्या राष्ट्राला ओढण्याचा प्रयत्न सर्वत्र सारखा चालू आहे. अशा प्रकारच्या अव्याहत प्रचारामुळे व कृतीमुळे आंतरराष्ट्रीय संबंधात शीतयुद्धाला सुरूवात झाली आहे.