एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला 'आघात तंत्र' असे म्हणतात. याच आघात तंत्राचा वापर करून पुराश्मयुगातील कुशल मानव आणि ताठ कण्याच्या मानवाने हत्यारे बनविली. परंतु या हत्यारांच्या केवळ एकाच बाजूला धार असल्यामुळे ही हत्यारे ओबड – धोबड होती.