आतिथ्य व्यवस्थापनाचा हा उद्योग काही अब्ज डॉलर्सचा डोलारा असून तो ग्राहकांजवळ असलेला मोकळा वेळ आणि खर्च करण्यासाठी जवळ असलेला पैसा या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. आतिथ्य व्यवस्थापन म्हणजे अतिथी आणि यजमान यांच्यात असलेलं व्यावहारिक नातं. अतिथींचे आगत्याने आदरातिथ्य करणे, हेच या उद्योगाचे मुख्य सूत्र आहे.