आदिवासी लोकांची जीवनशैली कशी आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो; त्यांची तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात. आदिवासी अर्थव्यवस्थेत गटवार श्रमविभाजनाचा वा धंदेवार भिन्न सामाजिक गटांचा अभाव असतो. सर्व लोक सर्व प्रकारची कामे करतात. याशिवाय आदिवासी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने प्राथमिक स्वरूपाची असतात.