आधुनिक विज्ञानाचा उदय 17 व्या शतकात गॅलिलिओ-न्यूटन यांच्या काळात युरोपात झाला, असे मानले जाते. ही सुरुवात प्राथमिक पातळीवरच्या भौतिकी क्षेत्रात झाली. उत्तरोत्तर अधिकाधिक अचूक प्रयोग आणि गणिताचा ठाम पाया यांच्या आधारावर भौतिकीचे स्वरूप अधिकाधिक प्रगल्भ होत गेले.