आनुवंशिक विकृती म्हणजे काय?
✅ Updated recently
गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परीवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे आनुवंशिक विकृती होय. आनुवंशिक विकृतीमध्ये गुणसूत्राचे आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे स्थानांतरण अशा स्थितीचा समावेश होतो. उदाहरणार्थ : दुभंगलेले ओठ, वर्णकहीनता ही शारीरिक व्यंगे असतात.