घरातील पाणी वापरातही काटकसर करा :
तसेच आंघोळीचे पाणी सुध्दा साठवून त्याचा उपयोग फरशी पुसणे, सडा टाकणे यासाठी करता येवू शकतो. पिण्याचे पाणी घेतांना जेवढे आवश्यक तेवढेच घ्या. जास्तीचे पाणी घेवून राहिलेले पाणी फेकून द्यावे लागू नये म्हणून तांब्या व फुलपात्राचा वापर करा. पाण्याची निश्चित बचत होईल.