सन २०१८-१९ दुष्काळ घोषित केलेले तालुके तसेच दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या गावांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती
लाभाचा तपशील
तुम्हाला पुढीलप्रमाणे सवलती मिळतील तसेच उपाययोजना केल्या जातील. १) जमीन महसुलामध्ये सूट मिळेल.लाभाचा तपशील २) तुमच्या सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल. ३) तुमच्या शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाईल. ४) तुम्हाला कृषी पंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५% सूट मिळेल. ५) तुम्ही शालेय / महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यास तुम्हाला परीक्षा शुल्कात माफी मिळेल. ६) जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता असेल अशा आवश्यक त्या सर्व ठिकाणी टँकरद्वारे पाणी पोहोचविले जाईल. ७) तुम्ही टंचाई जाहीर झालेल्या गावातील शेतकरी असाल तर तुमच्या शेती पंपाची वीज जोडणी बंद केली जाणार नाही