भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली . नेहरूंनी १९२८ मध्ये मांडलेल्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेची आठवण म्हणून ही तारीख निवडण्यात आली.