आयुर्वेदात मात्र दोष हा शब्द शरीर आणि मनाच्या क्रिया तसेच शरीरातील अवयवांची रचना यांसाठी प्राधान्याने कारणीभूत असलेल्या घटकांसाठी वापरला जातो. दोष मुळात दोन प्रकारचे असतात — शारीरदोष आणि मानसदोष. वात, पित्त व कफ हे तीन दोष व त्यांचे प्रत्येकी पाच प्रकार यांना शारीरदोष म्हणतात.