आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल म्हणजे काय?
✅ Updated recently
पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या उत्तरेकडील ६६° ३०' उ. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला आर्क्टिक वृत्त किंवा उत्तर ध्रुववृत्त म्हणून संबोधले जाते. पृथ्वीच्या नकाशावर सामान्यपणे विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, उत्तर ध्रुववृत्त आणि दक्षिण ध्रुववृत्त (अंटार्क्टिक वृत्त) ही प्रमुख पाच काल्पनिक अक्षवृत्ते दाखविली जातात.