परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात. विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात; जागतिकीकरण होऊ लागते.