आर्यांनी वैदिक संस्कृती विकसीत केली होती. सप्तसिंधु हा सात महान नद्यांचा प्रदेश होता. यामध्ये लुप्त झालेली सरस्वती नदी तसेच सतलज (शतुद्री), बियास (विपाशा), रावी (परुष्णी), चिनाब (असिक्नी), झेलम (वितस्ता) आणि सिंधू या नद्यांचा समावेश होतो. ऋग्वेदामध्ये या सर्व नद्यांचा उल्लेख आढळतो.