आशिया खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर असून दक्षिणेस हिंदी महासागर आहे. पश्चिमेकडील अरबी समुद्र, तांबडा समुद्र व सुएझ कालवा यांनी आशिया आफ्रिकेपासून विभक्त झाला आहे. कॉकेशस पर्वतरांग, कॅस्पियन समुद्र, उरल नदी आणि उरल पर्वत ही यूरोप आणि आशिया यांमधील सीमा मानली जाते.