संचालक मंडळात बारा संचालक असून त्यांपैकी आठ इकॅफे-प्रदेशातील देशांचा व चार बाहेरील देशांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक संचालकाची मुदत दोन वर्षांसाठी असते परंतु त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकते.
आशियाई विकास बँक :
आशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने (इकॅफे) पुरस्कारिलेली ही बँक डिसेंबर १९६६ मध्ये कार्यान्वित झाली. इकॅफे प्रदेशामधील व बाहेरील मिळून ४४ देश व प्रदेश या बॅंकेचे सदस्य आहेत (३० एप्रिल १९७४). या देशांतील खाजगी व सरकारी भांडवलगुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, त्यांच्या विदेश व्यापाराची, विशेषतः आंतरप्रदेशीय व्यापाराची, वाढ व्हावी म्हणून आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविणे, कृषिउद्योग आणि सार्वजनिक प्रशासनविषयक राष्ट्रीय वा प्रदेशीय पातळीवर कार्य करीत असलेल्या संस्थांच्या वाढीसाठी किंवा नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी तांत्रिक साहाय्य देणे आणि सदस्य-देशांतील साधनसामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून आर्थिक विकासास हातभार लावणे, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बँकेची स्थापना झाली. बँकेचे नियंत्रण मंडळ व संचालक मंडळ असे दोन विभाग असून थायलंडचे सेर्म व्हिनिच्छायाकुल आणि जपानचे शिरो इनोउये हे अनुक्रमे त्या दोन मंडळांचे अध्यक्ष आहेत. नियंत्रक मंडळामध्ये प्रत्येक सदस्य-देशाचा एक नियंत्रक व एक पर्यायी नियंत्रक असतो. नवीन देशांना सभासदत्व देणे, अधिकृत भांडवलात आवश्यकता असल्यास बदल करणे, सनदेमध्ये दुरुस्ती करणे हे अधिकार नियंत्रक मंडळाकडे असून मंडळाची दरवर्षी एकदा बैठक भरते. संचालक मंडळात बारा संचालक असून त्यांपैकी आठ इकॅफे-प्रदेशातील देशांचा व चार बाहेरील देशांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक संचालकाची मुदत दोन वर्षांसाठी असते परंतु त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकते. बँकेच्या विविध कार्यांवर देखरेख ठेवणे, कर्जे मंजूर करणे ह्यांसारखी महत्त्वाची कामे संचालक मंडळाकडे सोपविलेली आहेत. भारताचे सी. एस्. कृष्णमूर्ती संचालक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत (१९७२).
बँकेचे अधिकृत भांडवल ११० कोटी डॉलर व खपलेले भांडवल १००·५३ कोटी डॉलर आहे. प्रत्येक सदस्य-देशाना त्याच्या वाटणीच्या खपलेल्या भांडवलाची निम्मी रक्कम पाच समान वार्षिक हप्त्यांत द्यावयाची असून प्रत्येक हप्त्यातील अर्धी रक्कम सोन्यात किंवा परिवर्तनशील चलनात आणि निम्मी स्वचलनात भरावयाची तरतूद आहे. राहिलेल्या निम्म्या भांडवलाची रक्कम मागणीस्वरूप भागांच्या रूपात ठेवलेली आहे. भारताचा वाटा ९·३ कोटी डॉलर असून सर्वाधिक रक्कम देणाऱ्या सदस्य-देशांत भारताचा दुसरा क्रम लागतो. बँकेच्या अधिकृत भांडवलात १५० टक्क्यांनी वाढ करण्यास सदस्य-देशांनी मान्यता दिल्यामुळे १९७३ च्या अखेरीस बँकेचे अधिकृत भांडवल ३३६·५ कोटी डॉलर झाले.
कृषिविकास निधी, तांत्रिक साहाय्य निधी व बहुउद्देशीय निधी असे तीन विशेष निधी अमेरिका, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, कॅनडा, इटली आदी बँकेच्या कक्षेबाहेरील देशांच्या मदतीने स्थापन करण्यात आले आहेत. विशेष निधीतील पैसा दाता-देशांच्या इच्छेनुरूप, विशिष्ट क्षेत्रांतील प्रकल्पांसाठी खर्च केला जातो. बँकेने १९६८ पासून सदस्यदेशांना कर्ज देण्यास प्रारंभ केला. कर्जाचा तपशील पुढील तक्ता क्र .१ व २ वरून स्पष्ट होईल.
बँकेने ३० नोव्हेंबर १९७३ पर्यंत १९ सदस्य–देशांतील १३६ प्रकल्पांकरिता ११८·६१ कोटी डॉलर रकमेची १४९ कर्जे देण्याचे मान्य केले. यांपैकी ९,०९७ लक्ष डॉलरची ९० कर्जे सामान्य भांडवली द्रव्यातून, तर उर्वरित २,७६४ लक्ष डॉलरची ५९ कर्जे विशेष निधिद्रव्यातून दिली गेली. बँकेने तांत्रिक साहाय्य निधीद्वारा सदस्य–देशांना मदत करण्यास १९६७ पासून प्रारंभ केला. त्या साली इंडोनेशियामधील अन्न–पिकांच्या उत्पादनासंबंधीचा अभ्यास–अहवाल बँकेने तयार केला होता. तेव्हापासून ३० नोव्हेंबर १९७३ पर्यंत बँकेने १७ सदस्य– देशांतील ९२ प्रकल्पांना १२९ लक्ष डॉलर रकमेचे तांत्रिक साहाय्य पुरविले.
आशियाई विकास बँकेचे संचालक मंडळ किती सदस्याचे बनलेले असते?
✅ Updated recently