आशिया (Asia) खंड हे पृथ्वीवरील सर्वात मोठे खंड आहे. या खंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या सुमारे ३० टक्के, तर पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या सुमारे ८.७ टक्के भूभाग व्यापला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ४ कोटी, ४० लाख चौरस किलोमीटर आहे.