इंग्लंडमध्ये लोकशाही कोणी सुरू केली?
✅ Updated recently
१२१५ मध्ये इंग्लंडमधील सरंजामदारांनी राजा जॉन याला सादर केलेली, आपल्या मागण्यांची सनद -“मॅग्ना कार्टा “ ही घटना संसदीय लोकशाही स्थापनेच्या दिशेने झालेल्या विकासाचा प्रारंभ मानला जाते. त्यानंतरचा इंग्लंडचा इतिहास हा एका अर्थाने संसदीय लोकशाहीच्या विकासाचा इतिहास आहे आणि ही विकासाची प्रक्रिया अजूनही चालू आहे.