वसाहतवाद यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत इंग्रजी रुजू केले म्हणजेच प्राचीन काळातील संस्कृत भाषा,संस्कृत भाषेचे शिक्षण नंतरच्या काळात राहिले नाही.पण वसाहतवादाच्या शिक्षण पद्धतीचा भारतीयांवर तगडा प्रभाव पडला.आणि उच्च शिक्षित भारतीय सामाजिक चळवळी करू लागले.इंग्रजीतून दिलेले शिक्षणामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली.आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते तर ते लौकिक जीवनाशी संबंधित होते.त्यामुळे त्यात जास्तीत जास्त प्रात्यक्षिक विषयांचा समावेश होता.