म्हणून इतिवृत्त लेखनाची जबाबदारी लेखनाची सवय असलेल्या शिक्षक, पत्रकार, पोलीस, वकील आणि राज्य शासनात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी वर्गातील व्यक्तींना द्यावी. तसे त्यांना प्रवृत्त करावे, कारण मुद्देसूद आणि प्रवाही इतिवृत्त लेखन ही प्रत्येक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची अत्यावश्यक गरज आहे.