मानव त्यांच्या पर्यावरणाशी संवाद साधतो आणि त्यांच्या गरजेनुसार त्यात बदल करतो . आदिम मानव साधे जीवन जगत, आणि त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गातून (शिकार करून, फळे खाऊन, झाडांवर आणि गुहेत राहून, इ.) त्यांच्या गरजा पूर्ण करत.