इराकची समृद्ध संस्कृती
असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता.