मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.