उष्ण तापमानात प्राणी कसे जगतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तापमान प्राणिशरीराचे : प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक कोशिकेत (पेशीत) अपचय प्रक्रियेमुळे (जटिल पदार्थांचे साध्या संयुगात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेमुळे) उष्णता उत्पन्न होते. या प्रक्रियेत अन्नाचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सीडीभवन] अथवा विघटन होऊन ऊर्जा उत्पन्न होते आणि तिच्यामुळे कोशिकेच्या जीवनक्रिया चालू राहतात.