मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीमुळे ऊर्जा मिळविणे, ऊर्जेचे उपयुक्त स्वरूपात रूपांतर करणे आणि ऊर्जेचा विविध कारणांसाठी वापर करणे शक्य झाले आहे. उष्णता, प्रकाश आणि विद्युत् यांचा पुरवठा करण्याकरिता ज्यांपासून ऊर्जा मिळविता येते, अशी नैसर्गिक ऊर्जा साधने म्हणजे म्हणजे शक्ति-उदगम वा ऊर्जा-उदगम होत.