ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जेचा कमी वापर करणे, उदाहरणार्ण एका खोलीतून बाहेर पडताना तेथील दिवे बंद करणे. तर, ऊर्जा कार्यक्षमतेचा अर्थ असा होतो की, सुज्ञपणे ऊर्जा वापरणे. म्हणजे फ्लुरोसंट दिव्याऐवजी एलईडी दिवे वापरून समान प्रकाश मिळविणे. ऊर्जा संवंर्धनामध्ये सध्या असलेल्या साधनांची क्षमता सुयोग्य पद्धतीने वापरली जाते.