ऍरिझोना सर्वात उष्ण राज्य आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. सोनोराच्या वाळवंटात वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच ग्रँड कॅन्यन व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.