एम. एस. स्वामीनाथन हे भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ आहेत. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. हरित क्रांतीचा एक भाग म्हणून त्यांनी भारतात गव्हाच्या उच्च उत्पन्न देणार्‍या वाणांचा विकास केला. हरित क्रांतीच्या प्रसारामुळे भारताला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवता आली.