ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन : इतिहासाचा अभ्यास करताना ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यातील खरेखोटेपणा, बनावटपणा इतिहासकारांना तपासावा लागतो. यातील खरी व खोटी साधने कोणती हे शोधावे लागते. केवळ जुना लिखित पुरावा आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही.